अलिबाग तालुक्यात कोरोनाचे 4 नवे रुग्ण

By Raigad Times    20-Jan-2021
Total Views |
Alibag _1  H x
 
वरसोली कोळीवाडा, गोंधळपाडा, रेवदंडा येथील रुग्णांचा समावेश
 
अलिबाग । अलिबाग तालुक्यात आज (20 जानेवारी) कोरोनाच्या 4 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये वरसोली कोळीवाडा येथील 2 आणि रेवदंडा, गोंधळपाडा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
 
आज दिवसभरात एकही रुग्ण बरा झाला नसला तरी, सुदैवाने मृत्यूची नोंद झालेली आहे. आजअखेर अलिबाग तालुक्यात एकूण 5 हजार 169 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 4 हजार 993 रुग्ण कोरोनावर मात करुन सुखरुप घरी परतले आहेत. तर दुर्दैवाने 141 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 35 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
 
आज (20 जानेवारी) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :

Alibag _1  H x