श्रीवर्धन तालुक्यातील प्रतिष्ठेच्या दिघी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा

By Raigad Times    19-Jan-2021
Total Views |
Gram Panchayat Election_1
 
13 पैकी 9 जागा सनेकडे तर 4 राष्ट्रवादी काँग्रेस
बोर्लीपंचतन (अभय पाटील) । श्रीवर्धन तालुक्यातील बहुचर्चित असणार्‍या व दिघी पोर्टमुळे प्रसिद्धीस असलेल्या दिघी ग्रुप ग्रामपंचायतीवर शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. सोमवारी (18 जानेवारी) जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निकालामध्ये 13 पैकी 9 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले असून राष्ट्रवादीने 4 जागांवर विजय मिळवला आहे.
 
दिघी ग्रामपंचायत नेहमीच चर्चेमध्ये राहिली असून अखेरच्या कालावधीमध्ये प्रशासक ग्रामपंचायतीचे काम पाहत होते. आताच्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान घेण्यात आले. यामध्ये प्रभाग क्रमांक 3 मधून संगीता वाघमारे या शिवसेनेच्या उमेदवार बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर उर्वरित 12 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती.
 
Dighi Grampanchayat_Shriv 
 
यामध्ये 64.73 टक्के मतदान झाले होते. या ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र् नवनिर्माण सेना या प्रमुख पक्षांबरोबर अपक्ष उमेदवारदेखील निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमवण्यासाठी उभे होते. या निवडणुकीचा निकालाची मतमोजणी सोमवारी शासकीय मध्यवर्ती कार्यलय श्रीवर्धन येथे पार पडली. यामध्ये 12 जागांपैकी 8 जागांवर शिवसेना तर 4 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले.
 
या निवडणुकीमध्ये माजी सभापती देविदास कावळे यांनी प्रभाग 1 मधून निवडणूक लढविली. यामध्ये ते विजयी झाले तर माजी सरपंच सुमती चिकाटी यांना मात्र पराभवाला तोंड द्यावे लागले.
प्रभागनिहाय झालेले मतदान :
प्रभाग क्रमांक 1
नागरिकांचा मागास प्रवर्ग
1) कावळे देविदास (राष्ट्रवादी) - 301 मते (विजयी)
2) कांदेकर किरण (शिवसेना) - 242
3) गुणाजी मंगेश (भाजप) - 40
4) भालदार हरिशचंद्र (मनसे) - 27
5) मेंदाडकर किसन (अपक्ष) - 11
नोटा- 11
अनुसूचित जमाती प्रवर्ग (स्त्री)
1) पवार काशी (शिवसेना) - 316 (विजयी)
2) वाघमारे रंजना (राष्ट्रवादी)- 280
नोटा- 36
नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)
1) कल्पना संदेश कदम (राष्ट्रवादी)- 319 मते (विजयी)
2) चिकाटी सुमती (शिवसेना) - 229
3) वाढई गीता (अपक्ष) - 31
4) निशानदार वासंती (भाजप) - 37
नोटा- 16
प्रभाग क्रमांक 2
नागरिकांचा मागास प्रवर्ग
1) गुणाजी किशोर (भाजप) - 116
2) गोरिवले विपुल (सेना) - 419 (विजयी)
3) मेंदाडकर रुपेश (राष्ट्रवादी) - 44
नोटा- 25
अनुसूचित जमाती (स्त्री)
1) पवार प्रतीक्षा (सेना) - 484 (विजयी)
2) वाघमारे रंजना (भाजप) - 92
नोटा- 38
प्रभाग क्रमांक-3
अनुसूचित जमाती
1) पवार अनंता (राष्ट्रवादी) - 42
2) पवार रघुनाथ- 5
3) पवार रेश्मा - 18
4) मेंदाडकर गोपाळ (सेना) - 343 (विजयी)
5) वाघमारे बबन- 52
नोटा- 10
अनुसूचित जमाती (स्त्री)
1) पवार जया - 70
2) वाघमारे अनिता (सेना) - 351(विजयी)
संगीता वाघमारे (शिवसेना) - बिनविरोध विजयी
प्रभाग क्रमांक 4
अनुसूचित जमाती
1) चिकाटी लक्ष्मण (सेना) - 347 (विजयी)
2) पवार अनंता (राष्ट्रवादी) - 46
3) भणगोजी लक्ष्मण ( सेना)- 307 (विजयी)
4) वाघमारे चंद्रकांत- 66
5) वाघमारे बबन- 47
प्रभाग क्रमांक - 5
अनुसूचित जमाती
1) पवार अनंता (राष्ट्रवादी) - 233 (विजयी)
2) पवार राजेश - 168
3) वाघमारे चंद्रकांत - 11
नोटा- 15
नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)
1) कांदेकर निर्मला (राष्ट्रवादी) - 195 (विजयी)
2) निशानदार वासंती-(भाजप) - 30
3) भणगोजी लतिका (सेना) - 141
4) वाढई गीता (अपक्ष) - 51
नोटा- 10
सर्वसाधारण स्त्री
1) मोरे तेजल (राष्ट्रवादी)- 187
2) पठाण इरम (शिवसेना) - 195 (विजयी)
3) भालदार नाईला (मनसे) - 32
नोटा- 13