तळोजा येथील दुकानात घरफोडी करणारे दोघे गजाआड

15 Jan 2021 19:10:29
arrest _1  H x  
 
पनवेल । तळोजा परिसरातील दुकानात घरफोडी करणार्‍या 2 चोरांना तळोजा पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने गजाआड केले आहे. त्यांच्याकडून घरफोडीचा ऐवजही हस्तगत करण्यात आला आहे.
 
जाफर अब्दुल जब्बार खान (24) व अमीर उर्फ अम्मू अय्युब खान (33) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघा चोरांनी खुटारी गाव येथील एका दुकानाचे कुलूप तोडून घरफोडी केली होती. यासंदर्भात पोलीस काशिनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तपास करीत होते.
 
या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच घरफोडीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0