ग्रामपंचायत निवडणूक : रायगडात 1 लाख 77 हजार 383 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

By Raigad Times    13-Jan-2021
Total Views |
ग्रामपंचायत निवडणूक : राय
 
जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान
299 मतदान केंद्रांची व्यवस्था
 
अलिबाग । जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी 299 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, जिल्ह्यातील 1 लाख 77 हजार 383 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
 
ग्रामपंचायत निवडणूक : राय
 
एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा जाहीर झाला होता. यापैकी 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. माणगाव तालुक्यातील एका ग्रामपंचायतीमध्ये एकूण जागांपैकी काही जागी आले नाहीत, मात्र उर्वरित जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान होणार नाही.
 
त्यामुळे उर्वरित 78 ग्रामपंचायतींमध्ये 612 जागांसाठी 15 जानेवारीला निवडणुका होत आहेत. यासाठी 299 मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान होणार असून या मतदान केंद्रावर 1 लाख 77 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) सर्जेराव मस्के-पाटील यांनी दिली आहे. यामध्ये 86 हजार 633 महिला मतदार आणि 90 हजार 748 पुरुष मतदार व इतर 2 मतदारांचा समावेश आहे.
 
शुक्रवारी, 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये आपला मतदानाचा हक्क जरुर बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आहे.