तळा शहरातील सौंदर्यात भर, कोऱ्या भिंतींवर आकर्षक चित्र

By Raigad Times    12-Jan-2021
Total Views |
 vasundhra_1  H
 
विराज टिळक / तळा | तळा तालुका हा ऐतिहासिक तालुका म्हणून ओळखला जातो. निसर्गाने नटलेला तालुका म्हणून या तालुक्याची ओळख आहे. हिरवा गार परिसर शहराकडे येणारा भव्य दुपदरी रस्ता विविध ठिकाणी असलेली धरण, शहरात असलेले शिवकालीन तलाव, तळगड किल्ला हे नेहमीच पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.

WhatsApp Image 2021-01-12 
 
आता या आकर्षणात आणखी भर पडणार आहे. तळा शहरात आता प्रत्येक कोरी आणि पडीक भिंत आकर्षक दिसणार आहे. या भिंतींवर आकर्षक चित्र काढण्यात येत आहेत आणि या चित्रातून नागरिकांना स्वच्छतेचे संदेश देण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे तळा शहराच्या सुंदरतेत आणखी भर पडणार आहे. तळा शहरात प्रवेश करताना उजव्या बाजूला नगर पंचायतीने सुंदर असं गार्डन तयार केलंय या हिरव्यागार गार्डन मुळे तळा शहरात प्रवेश करणाऱ्यांचं मनं प्रसन्न होत. त्याच प्रमाणे आता प्रत्येक भिंत रंगवण्याचे काम सुरु झाल्याने तळा शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. याच प्रमाणे तळा नगरपंचायतीने असे उपक्रम सुरु ठेवले तर पर्यटक तळा शहराला नक्की भेट देतील आणि त्यातून रोजगार निर्मिती होईल.