कोलाड-भिरा मार्गावर ट्रेलर उलटला; चालकाचा मृत्यू

By Raigad Times    01-Jan-2021
Total Views |
kolad aapghat_1 &nbs
 
कल्पेश पवार/कोलाड । मुंबई-गोवा महामार्गापाठोपाठ कोलाड-भिरा मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या मार्गावरील दूरटोली फाटा येथे मालवाहू ट्रेलर पलटी होऊन झालेल्या अपघातात ट्रेलरचालकाचा मृत्यू झाला.
 
शामलाल केदारनाथ चैरासिया (वय 55, मूळ रा. रेसुलाबाद, उत्तरप्रदेश, सध्या रा. सोनारी गाव उरण) असे मृत ट्रेलरचालकाचे नाव आहे. तो बुधवार, दि. 30 डिसेंबर 2020 रोजी ट्रेलर घेऊन कोलाड भिरा मार्गे चालला होता. भरधाव वेगाने जात असताना, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दूरटोली फाटा येथे ट्रेलर उलटला. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने शामलाल चौरासिया याचा मृत्यू झाला. तर ट्रेलरचेही मोठे नुकसान झाले आहे.
 
दरम्यान, या घटनेची नोंद कोलाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.