श्रीवर्धन : कारिवणे ग्रुप ग्रामपंचायतीवर बिनविरोध शिवसेनेचा भगवा

By Raigad Times    01-Jan-2021
Total Views |
Shrivardhan karvine gramp 
 
श्रीवर्धन । श्रीवर्धन तालुक्यात मुदत पुर्ण झालेल्याचार ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत त्यामध्ये दिघी, कारिवणे, गालसुरे, कोलमांडला ग्रामपंचायतींचा समावेश आसून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर पर्यंत होती त्यानुसार दिघी ग्रुप ग्रामपंचायत 13 जागा करीता 51 उमेदवारी अर्ज कारिवणे ग्रुप ग्रामपंचायत 7 जागांकरीता 7 अर्ज गालसुरे ग्रुप ग्रामपंचायत 9 जागांकरीता 18 तर कोलमांडला ग्रुप ग्रामपंचायत 7 जागांकरीता, 21 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
 
प्राप्त झालेल्या अर्जानुसार 31 डिसेंबर रोजी झालेल्या अर्ज छाननी प्रकियेमध्ये संपुर्ण अर्जाची तपासणी निवडणुक निर्णय अधिकार्‍यांमार्फत छाननी करण्यात आली प्राप्त झालेले अर्जा नुसार दिघी ग्रामपंचायतीचे प्राप्त झालेले 51 अर्ज नुसार 1 अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी आशिष मुकणे यांनी छाननी अंती अवैद्य ठरविला आहे बाकी इतर तिन ग्रामपंचायतीचे सर्वच अर्ज निवडणुक निर्णय आधिकार्‍यांनी वैद्य ठरविले आहेत.
 
दरम्यान निवडणूक प्रक्रियेमध्ये ग्रुप ग्रामपंचायत कारिवणे येथिल सात उमेदवार बिनविरोध निवडून आले असून पुर्वपार असलेले शिवसेनेचे वर्चस्व कायम राखून शिवसेनेचा भगवा झेंडा फडकविला आहे. यावेळी बिनविरोध आलेले सात सदस्यांचे अभिनंदन शिवसेना श्रीवर्धन मतदारसंघ संपर्क प्रमुख सुजित तांदळेकर, तालुका प्रमुख प्रतोष कोलथरकर, सभापती बाबुराव चोरगे, माजी जिल्हा परिषद उपाअध्यक्ष सुरेश पाटील, उप तालुका प्रमुख सुकुमार तोंडलेकर, उप तालुका प्रमुख अरूण शिगवण, विभाग प्रमुख गजानन कदम, चलेंद्र पोलेकर, जनार्दन गोवारी, शरद महाडिक, शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे वतीने करण्यात आले. अन्य तीन ग्रामपंचायत निवडकीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी मिळून एकत्र प्राबल्यनुसार इतर विरोधी पक्षाशी लढत लढणार असून निवडणुकीत महाविकास आघाडीचा वर्चस्व असणार आहे.