आता खवल्या मांजरांना मिळणार ‘सुरक्षा कवच’

01 Jan 2021 14:02:35
khawle manjar _1 &nb 
 
राज्य सरकारकडुन अभ्यासगटाची स्थापना
 
मुंबई । राज्यातील खवल्या मांजरांना अता सुरक्षा कवच मिळणार असून या मांजरांच्या संरक्षण आणी संर्वधनाच्या उपाययोजना सुचवण्यासाठी पुण्याचे वनसंरक्षक (वन्यजीव) रमेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाने अभ्यासगट स्थापन केला अहे. हा अभ्यासगट खवले मांजर प्रजातीच्या संरक्षण आणि संर्वधनासाठी अवश्यक असलेला कृती अराखडा तयार करून राज्य शासनास सादर करील.
 
राज्य वन्यजीव मंडळाच्या 15 व्या बैठकीत वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनी या प्रजातीच्या संरक्षण आणि संर्वधनासाठी उपाययोजना करण्याची अवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या या मताची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दखल घेत यासंबंधीच्या उपााययोजना सुचिवण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.या अभ्यासगटात वन्यजीव व्यवस्थापन, संशोधन आणि वन्यजीव गुन्हे क्षेत्रातील तज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. अभ्यासगटात दीपक खाडे-उपवनसंरक्षक- चिपळुण-रत्नागिरी, विश्वास काटदरे - सदस्य राज्य वन्यजीव मंडळ, डॉ. वरद बी गिरी- संस्थापक संचालक एनअयडीयुएस, नितीन देसाई संचालक सेंट्रल इंडिया वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया, रोहन भाटे माजी मानद वन्यजीव रक्षक सातारा यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे तर सातारा येथील उपवनसंरक्षक डॉ.बी.एस हाडा हे या अभ्यासगटाचे सदस्य सचिव असतील.
 
खवले मांजर ही महत्वाची प्रजाती असून ती वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतगगत अनुसूची 1 मध्ये समाचवष्ट आहे. विविध कारणांमुळे या प्रजातीला धोका निर्माण होत आहे. खवल्यांसाठी या मांजरांची शिकार करण्याचे प्रकार होउन त्यामध्ये संघटित गुन्हेगारीच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या संरक्षण आणि संर्वधनासाठी उपाययोजना करण्याची अवश्यकता राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली होती. आता हा अभ्यासगट खवल्या मांजरांचे अधिवास व्यवस्थापन, गुन्हेगारीवर आळा घालणे, गुप्त माहिती मिळवणे, जनजागृती कराणे यासारख्या बाबींचा विचार करून त्यांच्या संरक्षण आणि संर्वधनाचा कृती अराखडा तयार करील. खवले मांजर प्रजातीचा अधिवास, त्यांचे अस्तित्व, त्यांना असलेल्या धोक्याचा अभ्यास करणे, खवले मांजरीच्या अवैध व्यापाराच्या व्याप्तीचा अभ्यास करणे, अवैध व्यापारावर अळा घालणे,त्यांच्या संरक्षण आणि संर्वधनासाठी उपाययोजना सुचवणे ही या तांत्रिक अभ्यासगटाची कार्यकक्षा असेल.
 
 
Powered By Sangraha 9.0