शासनाच्या नगरविकास विभागाकडून अधिसूचना प्रसिद्ध
अलिबाग । पाली नगरपंचायत की ग्रामपंचायत? हा तिढा अखेर सुटला आहे. सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली ग्रामपंचायतीचे रुपांतर लवकरच नगरपंचायतीमध्ये होणार आहे. शासनाच्या नगरविकास विभागाकडून गुरुवारी (31 डिसेंबर) याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्याचे पाली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर होण्यासाठी येथील ग्रामस्थांची मागणी प्रलंबित होती. दिर्घकाळ हा तिढा सुटला नव्हता. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे याबाबत लवकर निर्णय व्हावा, यासाठी विनंती करण्यात आली होती. त्यानुषंगाने पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता.
या पाठपुराव्याला यश आले असून, 31 डिसेंबर 2020 रोजी पाली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्याबाबतची अधिसूचना शासनाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे.