माणगाव नगरपंचायत निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार

By Raigad Times    01-Jan-2021
Total Views |
ज्ञानदेव पवार  edit1_1&nb
 
जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवारांचे वक्तव्य
 
माणगाव । नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 2021 मध्ये होणार असून या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या नेत्यांनी अद्याप साधी चर्चा देखील आमच्याशी केलेली नाही.हि निवडणूक महाविकास आघाडीमार्फत लढविण्यास आम्ही उत्सुक आहोत.परंतु आघाडीतील मित्रपक्षांच्या नेत्यांनी आम्हाला या निवडणुकीत सन्मानपूर्वक जागा दिल्या पाहिजेत.नाहीतर हि निवडणूक काँग्रेस आय स्वबळावर लढणार असल्याचे माणगाव येथील रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले.
 
माणगाव नगरपंचायत निवडणुकीबाबत बोलताना ज्ञानदेव पवार पुढे म्हणाले कि, माणगाव शहरात तसेच तालुक्यात आजही काँगेस आय पक्षाची ताकद मोठी आहे.स्व.बॅ.ए.आर.अंतुले साहेबांना मानणारा मोठा वर्ग शहरात तसेच तालुक्यात आहे.आमची ताकद येणार्‍या माणगाव नगरपंचायत निवडणुकीत आम्ही नक्कीच दाखवून देऊ.राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे.त्यामुळे आघाडीतील आमचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी माणगाव नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस आय पक्षाला 17 पैकी किमान 5 ते 6 जागा दिल्या पाहिजेत.आम्ही वेळोवेळी आघाडीचा धर्म पाळला आहे.मात्र आम्हाला मित्रपक्षांची कधीच साथ मिळत नाही.
 
आम्हाला सन्मानपूर्वक माणगाव नगरपंचायत निवडणुकीत जागा मिळाल्यास आम्ही निश्चितच आघाडीसोबत राहू. नाहीतर आमच्यावर मित्रपक्ष अन्याय करणार असतील तर आम्ही स्वबळावर माणगाव नगरपंचायत निवडणूक लढणार असून नगरपंचायत हद्दीतील सर्व 17 वार्डांतून 17 उमेदवार उभे करणार असल्याचे ज्ञानदेव पवार यांनी सांगितले.