फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : प्लिस्कोव्हाची तीन तासांची झुंज यशस्वी!

By Raigad Times    30-Sep-2020
Total Views |
जोकोव्हिच, नदाल दुसऱ्या फेरीत; मेदवेदेवचे आव्हान संपुष्टात
 
फ्रेंच_1  H x W
 
 
फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : प्लिस्कोव्हाची तीन तासांची झुंज यशस्वी!
चेक प्रजासत्ताकच्या दुसऱ्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाला फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची दुसरी फेरी गाठण्यासाठी तब्बल तीन तास संघर्ष करावा लागला. मात्र इजिप्तच्या मायर शेरिफ हिचे आव्हान परतवून लावत प्लिस्कोव्हाने आगेकूच केली. अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिच तसेच ‘लाल मातीवरील बादशाह’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राफेल नदालने दुसरी फेरी गाठली. मात्र चौथ्या मानांकित डॅनिल मेदवेदेवचे आव्हान सलामीलाच संपुष्टात आले.
प्लिस्कोव्हाने मायर शेरिफ हिच्यावर ६-७ (९), ६-२, ६-४ असा विजय संपादन केला. पहिल्या सेटमध्ये २९ चुका आणि सहा दुहेरी चुका केल्याचा फटका प्लिस्कोव्हाला सहन करावा लागला. त्यामुळे शेरिफ हिने तब्बल आठ सेट पॉइंट वाचवत टायब्रेकरमध्ये पहिला सेट जिंकला. त्यानंतर आपला खेळ उंचावत प्लिस्कोव्हाने दुसरा आणि तिसरा सेट सहज जिंकत सामन्यात बाजी मारली. तिला दुसऱ्या फेरीत २०१७च्या विजेत्या येलेना ओस्तापेंको हिच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
सर्बियाच्या १७ ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोव्हिचने स्वीडनच्या मिकाएल यमेर याचा सहज फडशा पाडत फ्रे ंच स्पर्धेतील अभियानाची दमदार सुरुवात के ली. जोकोव्हिचने दीड तास रंगलेल्या या सामन्यात यमेरवर ६-०, ६-२, ६-३ असा विजय मिळवत दुसरी फेरी गाठली. गतविजेत्या नदालने इगोर गेरासिमोव्ह याला ६-४, ६-४, ६-२ असा सरळ तीन सेटमध्ये पराभवाचा धक्का देत दुसऱ्या फे रीत प्रवेश मिळवला. आता पुढील फेरीत नदालला अमेरिके च्या मॅकेंझी मॅकडोनाल्ड याचा सामना करावा लागेल.
चौथ्या मानांकित डॅनिल मेदवेदेवला पहिल्याच फेरीत हंगेरीच्या माटरेन फुकसोविक्स याच्याकडून ६-४, ७-६ (३), २-६, ६-१ असा पराभव पत्करावा लागला. यापूर्वी तीन वेळा फुकसोविक्सला हरवणाऱ्या मेदवेदेवला सलग चौथ्या वर्षी फ्रेंच स्पर्धेत सलामीलाच पराभूत व्हावे लागले. इटलीच्या सातव्या मानांकित मॅट्टेओ बेरेट्टिनी याने कॅनडाच्या व्हॅसिल पॉप्सिसिल याचा ६-३, ६-१, ६-३ असा सहज पाडाव केला.
महिलांमध्ये, डेन्मार्कची युवा टेनिसपटू क्लारा टाऊसन हिने अमेरिकेच्या २१व्या मानांकित जेनिफर ब्रॅडी हिला पहिल्या फेरीत ६-४, ३-६, ९-७ अशी पराभवाची धूळ चारली. १७ वर्षीय टाऊसन हिने पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची मुख्य फेरी गाठली असून तिने सलामीलाच मानांकित खेळाडूवर विजय मिळवत सर्वाचे लक्ष वेधले.चौथ्या मानांकित सोफिया केनिन हिने रशियाच्या लिउडमिला सॅमसोनोव्हा हिचे आव्हान ६-४, ३-६, ६-३ असे परतवून लावले.
* वेळ : दुपारी २:३० पासून
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २

कर्बर सलामीलाच पराभूत
* तीन ग्रँडस्लॅम विजेती अँजेलिक कर्बर हिला फ्रेंच खुल्या स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी सलामीलाच पराभूत व्हावे लागले. जर्मनीच्या १८व्या मानांकित कर्बर हिच्यावर स्लोव्हेनियाच्या १९ वर्षीय काजा जुवान हिने ३-६, ३-६ अशी सहज मात के ली. गतजागतिक क्रमवारीत अग्रस्थान पटकावणाऱ्या कर्बर हिने फ्रे ंच वगळता अन्य तीन ग्रँडस्लॅमवर नाव कोरले आहे. मात्र फ्रेंच स्पर्धेत तिला उपांत्यपूर्व फे रीपलिकडे मजल मारता आलेली नाही. दोन ग्रँडस्लॅम विजेती स्वेतलाना कु झनेत्सोव्हा हिलाही पहिल्याच फे रीत पराभवाचा धक्का बसला. कुझनेत्सोव्हाला रशियाच्या अ‍ॅनास्तेशिया पाव्हलुचेंकोव्हा हिने ६-१, २-६, ६-१ असे पराभूत केले.
दोन गतविजेत्यांचे आव्हान संपुष्टात
* दोन ग्रँडस्लॅम विजेती स्वेतलाना कु झनेत्सोव्हा हिलाही पहिल्याच फे रीत पराभवाचा धक्का बसला. २००९च्या फ्रेंच स्पर्धेतील विजेत्या कुझनेत्सोव्हाला रशियाच्या अ‍ॅनास्तेशिया पाव्हलुचेंकोव्हा हिने ६-१, २-६, ६-१ असे पराभूत केले. २०१६ मध्ये फ्रेंच स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या गार्बिन मुगुरुझा हिचेही आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. मुगुरुझाला तामारा झिदानसेक हिच्याकडून ७-५, ४-६, ८-६ अशी हार पत्करावी लागली.