फक्त 8,499 रुपयांत 5000mAh बॅटरी + ट्रिपल कॅमरा सेटअप, लेटेस्ट ‘स्वस्त’ स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर्स

By Raigad Times    30-Sep-2020
Total Views |
पहिल्या सेलमध्ये डिस्काउंटसह कॅशबॅक ऑफरही
 

phone_1  H x W: 
 
फक्त 8,499 रुपयांत 5000mAh बॅटरी + ट्रिपल कॅमरा सेटअप, लेटेस्ट ‘स्वस्त’ स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर्स
‘रिअलमी’चा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Realme Narzo 20A आज पहिल्यांदाच सेलमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. ट्रिपल रिअर कॅमेरा, 5000mAh क्षमतेची मोठी बॅटरी आणि रिव्हर्स चार्जिंगसारखे फीचर्स असलेला हा फोन आज दुपारी 12 वाजेपासून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि Realme.com वर सेलमध्ये उपलब्ध असेल.
Realme Narzo 20A ऑफर :-
 
पहिल्या सेलमध्ये हा फोन डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफरसह उपलब्ध असेल. ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे हा फोन ईएमआयवर खरेदी करणाऱ्यांना 5 टक्के सवलत मिळेल. तर, फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरही 5 टक्के कॅशबॅकची ऑफर आहे. सेलमध्ये हा फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 945 रुपयांच्या नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायही मिळेल.
Realme Narzo 20A स्पेसिफिकेशन्स :-
 
या फोनमध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले असून गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसरचा सपोर्ट असलेला हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित रिअलमी युआय ऑपरेटिंग सिस्टिमवर कार्यरत आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 12 मेगापिक्सेल, 2 मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सेल लेन्सचा समावेश आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी Realme Narzo 20A मध्ये 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ v5.0, जीपीएस/ए-जीपीएस, माइक्रो युएसबी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. फोनच्या मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर हे फीचर मिळेल. याशिवाय फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंग सपोर्टसह 5000mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
Realme Narzo 20A किंमत :-
 
Realme Narzo 20A च्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 8,499 रुपये, तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 9,499 रुपये आहे. हा फोन ‘ग्लोरी सिल्वर’ आणि ‘व्हिक्टरी ब्लू’ अशा दोन कलर व्हेरिअंटमध्ये मिळेल.