कशेडी घाटात लक्झरी बस दरीत कोसळली ; 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू , १६ जण जखमी

By Raigad Times    31-Dec-2020
Total Views |
Kashedi Ghat 7_1 &nb
 
पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात विरार मुंबई ते कणकवली जाणारी चिंतामणी ट्रॅव्हल्सची खाजगी लक्झरी बस कशेडी घाटात सुमारे 25 फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात आज (३१ डिसेंबर) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास भोगाव गावची हद्दीत घडला. या अपघातात एकजण ठार तर १६ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

Kashedi Ghat 2_1 &nb 
 
विरार मुंबई येथून कणकवलीकडे जाणारी चिंतामणी ट्रॅव्हल्सची खाजगी लक्झरी बस २७ प्रवासी, २ चालक, १ क्लीनर अशी एकूण ३० जण घेऊन कशेडी घाटातून कणकवली दिशेने जात होती. कशेडी घाटात भोगाव गावच्या हद्दीत खोल दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात ८ वर्षांचा मुलगा जागीच ठार झाला तर 16 प्रवासी बालंबाल बचावले आहेत.

Kashedi Ghat 3_1 &nb
 
हा अपघात पहाटे साखर झोपेत झाल्याने किंकाळ्यांनी परिसर हादरला. या अपघातात साई राजेंद्र राणे (रा. तरळे सिंधुदुर्ग) याचा जागीच मृत्यू झाला. तर राकेश मनोहर भालेकर (वय ३२, रा. उमरखेड चिपळूण), गंगाराम गोपाळ पडवळ (वय ६, रा. चेंबूर- संगमेश्वर), सुमित्रा गंगाराम पडवळ (वय ६०, रा.संगमेश्वर), चंद्र प्रिया विठ्ठल शिगवण (वय ६७, रा.हत्ती गाव संगमेश्वर), प्रनित चंद्रकांत चव्हाण (वय ३२, रा. जोगेश्वरी मुंबई), राजेंद्र कृष्णा राऊळ (वय ३६, रा. कणकवली), कृष्णा वासुदेव राऊळ (वय ७० राणा कणकवली), वनिता विजय प्रभू (वय ५६, राहणार तळे सिंधुदुर्ग), रिया राजेंद्र करमाळकर (वय २९, राहणार केळवली राजापूर), सलोनी सदानंद कावळे वय १४ राहणार मुंबई, आशा अशोक लोणकर वय ३२ राहणार राजापूर, विठ्ठल शिवराम शिगवण वय ७७ राहणार गोवंडी मुंबई, प्रमोद विठ्ठल मोहिते वय ४५ राहणार गोवंडी मुंबई, संतोष विठ्ठल मोहिते वय ४८ राहणार गोवंडी मुंबई, यज्ञा राजेंद्र करमाळकर वय १ वर्ष, वासुदेव तुकाराम शेलार वय ७० राहणार करमाळकर वाडी कणकवली अशी एकूण १६ प्रवासी हाता पायाला डोक्याला छातीला मुका मार लागून किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. पैकी वासुदेव शेलार हे ७० वर्षाचे वयोवृद्ध एक तासा पेक्षा जास्त वेळ गाडीत अडकून होते त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात रेस्क्यू टीम व पोलिसांना यश मिळाले आहे.
 

Kashedi Ghat 4_1 &nb
 
या अपघाताची माहिती कशेडी पोलिसांना समजतात कशेडी टेप चे सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर यांनी पोलीस कर्मचार्‍यांचे तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती पोलादपूर पोलिसांना दिली यावेळी पोलादपूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव पीएसआय लोणे यांनी पोलीस कर्मचार्‍यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रुग्णवाहिका व महाड येथील रेस्क्यू टीमला पाचारण केले रोप च्या साह्याने जखमींना बाहेर काढून पोलादपूर ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी दाखल केले.

Kashedi Ghat 5_1 &nb
 
या घटनेची माहिती पोलादपूर तहसीलदारांना समजतात तहसीलदार दिप्ती देसाई नायब तहसीलदार समीर देसाई यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
 
Kashedi Ghat 8_1 &nb
 
महाड येथील साळुंखे रेस्क्यू टीमचे प्रशांत साळुंखे, पार्थ बुटाला प्रणित साळुंखे ,प्रशांत बुटाला, हर्षद, कोकाटे, यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले तर जगद्गुरु स्वामी नरेंद्र महाराज रुग्णवाहिका चालक मुकुंद मोरे यांचेसह पोलादपूर 108 रुग्णवाहिका खेड येथील रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होऊन जखमींना ने आन करण्यासाठी मदत कार्य केले.
 
कशेडी पोलीस पोलादपूर पोलीस याबरोबर पोलीस मित्र महेश रांगडे सहदेव कदम आदींनी खोल दरीत उतरून रोप च्या साह्याने जखमी प्रवाशांना दरीतून बाहेर काढण्यासाठी मदत कार्य केले आहे.
 
सर्व जखमी प्रवाशांवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर राजेश सलगरे व व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी यांनी उपचार केले आहेत.