रायगड : गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार...

By Raigad Times    30-Dec-2020
Total Views |
Rape Case_Crime News_Maha
📌 ‘त्याचा’ व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 2 वर्षे करत होता अत्याचार
📌 महाड शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
महाड । गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार केला...इतकेच नव्हे तर त्याचे चित्रीकरण करुन ते व्हायरल करण्याची धमकी देऊन 2 वर्षे तो नराधम तिच्यावर अत्याचार करत होता. अखेर या महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी महाड शहर पोलिसांनी या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.
 
धोंडू भागोजी निवाते (रा. दस्तुरी नाका, महाड) असे या अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. जानेवारी-फेब्रुवारी 2019 मध्ये त्याने 39 वर्षीय पीडित महिलेला थंड पेयातून गुंगीचे औषध दिले. नशेच्या अवस्थेत असताना तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला आणि त्याचे चित्रीकरणही केले. त्यानंतर कधी लग्नाचे आमिष दाखवून, तर कधी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तो 24 डिसेंबर 2020 पर्यंत तिच्यावर अत्याचार करत राहिला.
 
दोन वर्षे हे सुरु होते. अखेर हे सर्व असह्य झाल्याने त्या पीडित महिलेने धोंडू निवाते याच्याविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम 376(2)(एन), 328, 506 अन्वये गुन्हा दाखल केला असून, त्याला मंगळवारी (29 डिसेंबर) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल हे करित आहेत.