कर्जत ग्रामपंचायत निवडणुक: 89 जागांसाठी 297 उमेदवारी अर्ज

By Raigad Times    30-Dec-2020
Total Views |
file photo_1  H
                                                                                                                                                              file photo
कर्जत । कर्जत तालुक्यात 9 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज पर्यंत 89 जागांसाठी 297 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून हुमगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.
 
तालुक्यात कोल्हारे, जिते, पोशिर, साळोख तर्फ वरेडी, हुमगाव, कडाव, वैजनाथ, भिवपुरी, आणि दामत या नऊ ग्रामपंच्यायतींच्या निवडणुका होत आहेत. आज अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत कोल्हारे ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी 44, जिते ग्रामपंचायतीच्या 7 जागांसाठी 26, पोशिर ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी 35, साळोख तर्फ वरेडी ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी 46, हुमगाव ग्रामपंचायतीच्या 7 जागांसाठी 6, कडाव ग्रामपंचायतीच्या 13 जागांसाठी 35, वैजनाथ ग्रामपंचायतीच्या 9 जागांसाठी 34, भिवपुरी ग्रामपंचायतीच्या 7 जागांसाठी 19, आणि दामत ग्रामपंचायतीच्या 13 जागांसाठी सर्वाधिक म्हणजे 52 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
असे एकूण 297 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी दिली आहे.