श्रीवर्धन : वडवली गावासाठी ५ लाखांचे जीम साहित्य

26 Dec 2020 10:51:58
Dighi _1  H x W
 
पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ग्रामपंचायतीकडे केले सुपूर्द
 
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वडवली हे गाव खासदार सुनील तटकरे यांनी संसद आदर्श गाव योजनेअंतर्गत दत्तक घेतले आहे. या गावाला खासदार, आमदार अनिकेत तटकरे व पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नाने गुरुवारी (२४ डिसेंबर) पाच लाखांचे जीम साहित्य ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आले.
 
सीएसआर फंडातून व्यायाम साहित्य घेण्यात आले होते व सर्व साहित्य पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वडवली ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आले. खासदारांनी वडवली गाव दत्तक घेतल्यापासून अनेक विकास कामे होत आहेत. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने काही वेळ विलंब झाला मात्र आता नवनवीन विकास कामे हाती घेत आहोत. शरीर तंतुरूस्त राहण्यासाठी शारीरिक व्यायाम गरजेचा आहे. त्यामुळे हे साहित्य गावाला भेट देण्यात आले आहे. शिवाय आणखी साहित्यदेखील देणार असल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी उपस्थितांना संबोधितात सांगितले. वडवली गाव हे मोठे गाव आहे आणि गावात सर्व समाजाचे नागरिक एकत्रितपणे व गुण्यागोविंदाने राहत आहे. गावातील अंतर्गत रस्त्यांचे कामे लवकरच पूर्ण होणार असल्याचेही यावेळी पालकमंत्र्यांनी नमूद केले.
 
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीवर्धन मतदार संघाचे अध्यक्ष महंमदभाई मेमन, वडवली ग्रामपंचायत सरपंच प्रियांका रुपेश नाकती, उपसरपंच दीपक कांबळे, आगरी समाज अध्यक्ष विकास नाक्ती, आगरी समाज महिला अध्यक्ष श्रुती धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य गणेश नाकती, वडवली ग्रामपंचायत सदस्य व श्रीवर्धन उपाध्यक्ष सूचित किर, दिवेआगर सरपंच उदय बापट, लाला जोशी, सिद्धेश कोसबे, जिल्हा परिषद सदस्या प्रगती अदावडे तसेच ग्रामस्थ व आगरी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच विजय पांडव यांनी केले.
Powered By Sangraha 9.0