पर्ससीन मासेमारीवर 1 जानेवारीपासून बंदी

By Raigad Times    25-Dec-2020
Total Views |
Persin fishing_1 &nb
 
शासनाकडून महाराष्ट्र सागरी अधिसूचना जारी
 
अलिबाग । पर्ससीन मासेमारीवर 1 जानेवारीपासून बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र सागरी अधिसूचनेतील तरतुदीनुसार ही बंदी घालण्यात आली असून, 1 जानेवारी ते 31 मे या कालावधीत पर्ससीन मासेमारी पूर्णपणे बंद राहणार आहे.
 
1 जून ते 31 जुलै हा पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी आहे. या कालावधीत यांत्रिक पद्धतीच्या मासेमारीवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.
 
महाराष्ट्र सागरी अधिनियम 1981 अंतर्गत पर्ससीन मासेमारीच्या अनुषंगाने शासनाने अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेची प्रत सर्व मच्छिमार सहकारी संस्थांना देण्यात आली आहे.
 
अधिसूचनेतील महत्वाच्या तरतुदीनुसार परवानाधारक पर्ससीन नौकांना सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत अधिसूचनेत नमूद केलेल्या क्षेत्रात व विहित जाळ्यांच्या आकाराचा वापर करून मासेमारी करता येते. 31 डिसेंबरला ही मुदत संपणार असून, 1 जानेवारी ते 31 मे या कालावधीत पर्ससीन मासेमारीवर बंदी राहणार आहे.