पोलादपूर तहसिलदार दिप्ती देसाई यांचे आवाहन
अलिबाग : सन 2019-20 मधील क्यार चक्रीवादळादरम्यान पोलादपूर तालुक्यामध्ये झालेल्या शेती नुकसानीतील आपदग्रस्तांना शासनातर्फे मदत वाटप करण्यात आली आहे . परंतु तालुक्यातील काही गावातील आपदग्रस्तांचे बँक खाते क्रमांक व आयएफएससी क्रमांक अद्यापर्यंत या कार्यालयाकडे प्राप्त झालेले नाहीत, त्यामुळे अनुदान वाटपास विलंब होत आहे.
अद्याप बँक खाते क्रमांक व आयएफएससी क्रमांक उपलब्ध न झालेल्या आपदग्रस्तांच्या यादया संबंधीत ग्रामपंचायत कार्यालय व तहसिल कार्यालय, पोलादपूर येथे प्रसिध्द करण्यात आल्या आहे.
तरी आपदग्रस्तांनी बँक खाते क्रमांक व आयएफएससी क्रमांक संबंधीत ग्रामसेवक/ तलाठी / कृषी सहाय्यक यांच्याकडे पुढील आठ दिवसात करावेत. तसे न झाल्यास संबंधीत आपदग्रस्त मदत घेण्यास इच्छुक नाहीत, असे गृहीत धरुन नुकसान भरपाई रक्कम शासनास समर्पित करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे आवाहन पोलादपूर तहसिलदार दिप्ती देसाई यांनी केले आहे.