अलिबाग । रायगड जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम काल (11 डिसेंबर) जाहीर झाला आहे. या ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुका जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये अलिबाग तालुक्यातील 4, पेण 7, पनवेल 24, उरण 6, कर्जत 9, रोहा 21, माणगाव 5, महाड 5, श्रीवर्धन 4, म्हसळा 3 अशा 88 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
निवडणुका जाहीर झालेल्या जिल्ह्यातील तालुकानिहाय 88 ग्रामपंचायती खालीलप्रमाणे :
अलिबाग तालुका (एकूण 4) - मान तर्फे झिराड, सासवणे, पेझारी, वाघोडे
पेण तालुका (एकूण 7) - काळेश्री, बोर्झे, वाकरुळ, खारपाले, कामार्ली, आंबेघर, जोहे
पनवेल तालुका (एकूण 24) - बारवई, साई, सावळे, खानाव, वलप, आकुर्ली, हरिग्राम, खैरवाडी, नानोशी, पोसरी, खानावले, उमरोली, आपटा, पालीदेवद, कोळखे, सांगुर्ली, मोर्बे, उसर्ली खुर्द, पाले बुद्रूक, देवळोली, केवाळे, वाकडी, वाजेे, वारदोली
उरण तालुका (एकूण 6) - चाणजे, केगांव, नागांव, म्हातवली, फुंडे, वेश्वी
कर्जत तालुका (एकूण 9)- कोल्हारे, जिते, पोशीर, साळोख तर्फे वरेडी, हुमगाव, कडाव, वैजनाथ, भिवपूरी, दामत
रोहा तालुका (एकूण 21) - निडी तर्फे अष्टमी, रोठ बुद्रुक, रोठ खुर्द, तळाघर, घोसाळे, शेणवई, धामणसई, मालसई, महाळूंगे, शेडसई, तिसे, वरसे, वरवटणे, खांब, पळस, कोंडगाव, ऐनघर, चिंचवली तर्फे दिवाळी, वाशी, वावेपोटगे, गोवे
माणगाव तालुका (एकूण 5) - बामणोली, देवळी, लोणेरे, लाखपाले, टेमपाले
महाड तालुका (एकूण 5) - नरवण, भेलोशी, मांडले, आसनपोई, बिरवाडी
श्रीवर्धन तालुका (एकूण 4) - कोलमांडले, कारिवणे, गालसूरे, दिघी
म्हसळा तालुका (एकूण 3) - पाभरे, केल्टे, लिपणी वावे