अलिबाग । रत्नागिरीपाठोपाठ रायगडच्या समुद्रकिनारीदेखील रात्री चमकणार्या निळया रंगाच्या लाटा पहायला मिळाल्या. आकाश चंदनशिव आणि त्याचे मित्रांना हा नजारा अनुभवायला मिळला. ग्रामपंचायतीच्या सदस्या हर्षदा मयेकर यांनी हे फोटा सोशलमिडीयावर शेअर केले आहेत.
बुधवारी रात्री या निळया रंगाचा प्रकाश दिसायला लागतो. हळूहळू तो अधिक चमकदार होतो. रायगड जिल्हयात पहिल्यांदाच असा प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीच्या किनारपट्टीवर असा अद्भुत नजारा पहायला मिळाला होता. मात्र याबाबत मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकार्यांना कोणतीही माहिती नसल्याचे समजते.
निसर्गाच्या या अद्भुत नजार्याचे कुतूहल सर्वांनाच आहे. बायोलूमिनेसेन्ट डिनोफ्लगलेट्स या सूक्ष्म जीवांच्या निघणार्या निळ्या प्रकाशामुळे लाटा चकाकत आहेत. असा अभ्यासकांचा दावा आहे. समुद्रात या जिलेट्स सूक्ष्म जीवांची जास्त वाढ होण्यामुळे माशांवर विपरित परिणाम होत असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.