हॉटेल व्यावसायिकांना औद्योगिक दराने कर आकारणी करणार

By Raigad Times    05-Nov-2020
Total Views |
Mantralay Mumbai, Cabinet
 
  • आदरातिथ्य क्षेत्राला औद्योगिक दर्जा देण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
  • 1 एप्रिल 2021 पासून अंमलबजावणी होणार
 मुंबई । कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर आदरातिथ्य क्षेत्राचे पुनरुज्जीवन व पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने आदरातिथ्य क्षेत्राला औद्योगिक दर्जा देण्याचा निर्णय आज (5 नोव्हेंबर) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
 
यानुसार प्रथम टप्प्यात केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडे नोंदणीकृत असलेल्या हॉटेल व्यावसायिकांकडून 1 एप्रिल 2021 पासून वीज दर, वीज शुल्क, पाणी पट्टी, मालमत्ता कर, विकास कर व अकृषिक कराची आकारणी औद्योगिक दराने करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडे नोंदणीकृत नसलेल्या हॉटेल व्यावसायिकांकडून औद्योगिक दराने कर आकारणी करण्याकरिता निकष विहित करण्यासाठी एक तज्ञ समिती नेमून राज्याचे निकष निश्चित करण्यात येतील.
 
त्यानंतर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबवून निकषांची पूर्तता करण्यार्‍या हॉटेल व्यावसायिकांना औद्योगिक दराने कर आकारणी लागू करण्यात येईल.