महागृहनिर्माण योजनेतील सदनिकाधारकांना सिडकोचा दिलासा

By Raigad Times    05-Nov-2020
Total Views |
CIDCO Bhawan_1  
 
घरांसाठी फक्त 1 हजार रुपयांचे मुद्रांक शुल्क निश्चित
 
नवी मुंबई । राज्य शासनाच्या घरांसाठी करारनामा करतेवेळी 1 हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करत सिडको महामंडळानेही सदनिकाधारकांना दिलासा दिला आहे.
 
आपल्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महागृहनिर्माण योजनेपैकी ज्या घरांसाठी सोडत काढण्यात आली होती, त्या घरांसाठी करारनामा करतेवेळी केवळ 1 हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
 
सदर निर्णयामुळे या योजनेतील लाभार्थी सदनिकाधारकांबरोबर करारनामा करतेवेळी सदर शुल्क आकारण्याचे मुद्रांक शुल्क विभागाला कळविण्यात येईल.