2020-21 मध्ये वार्षिक वाहनकराच्या 50 टक्के करमाफी!

05 Nov 2020 14:40:54
Vehicle Tax 2020_1 &
 
शासनाचा निर्णय

अलिबाग । राज्यामध्ये वार्षिक कर भरणार्‍या वाहनांना 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2020 या सहा महिन्यांच्या कालावधीत कर भरण्यापासून 100 टक्के करमाफी म्हणजे सन 2020-21 या वर्षासाठी एकूण वार्षिक कराच्या 50 टक्के करमाफी देण्यास मान्यता देण्यात यावी, असा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

जर वाहनधारकाने एप्रिल ते सप्टेंबर 2020 या कालावधीचा कर भरला असल्यास तो पुढील कालावधीकरिता म्हणजे ऑक्टोबर 2020 ते मार्च 2021 या कालावधीसाठी देय करात समायोजित करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. तसेच जे वाहनमालक 31 मार्च 2020 पर्यंतचा थकीत कर 31 डिसेंबर 2020 पर्यंत दंड व्याजासह भरतील, त्यांनासुध्दा करमाफीची सवलत देण्यात असल्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे.
Powered By Sangraha 9.0