धाकटी पंढरीतील बोंबल्या विठोबा मंदीरात भक्तांची मांदीयाळी

By Raigad Times    26-Nov-2020
Total Views |
khopoli vitthal mandir_1&
 
यात्रा रद्द मात्र भाविकांची दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी
 
खोपोली । जगत गुरु संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन भूमीतील धाकटी पंढरीत कार्तिक एकादशीनिमित्ताने विठ्ठल रूखमाईच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली आहे .कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे यंदाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासन व ग्रामस्थांनी घेतल्याने भाविकांचा मोठी हिरमोड झाला आहे.
 
खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई गावच्या हाद्दीत उंच टेकडीवर विठ्ठल रूखमाईचे मंदीर होते. याठिकाणी संत तुकाराम महाराज मिरीचा व्यवसाय करण्यासाठी येत असत परिसरातील काही लोकांनी महाराजांचे पैसे बुडविल्याने त्यांनी देवाचा टाहो घेतला असता साक्षात पांडूरंगाने दर्शन देत बुडालेले पैसे परत मिळवून दिले त्यामुळेच बोंबल्या विठोबा असे नाव पडले असल्याची अख्यायिका असून शेकडो वर्षापासून आषढी व कार्तिकी एकादशीला महाराष्ट्रातून भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात कार्तिका एकादशी आदल्या दिवशी पालखीचा मान कै. मारूती दगडू पाटील यांच्या कुटूंबाला मिळाला असून यावेळी ह.भ.प.गूरूवर्य तानाजी महाराज यांचे किर्तन झाले त्यानंतर ताकई गावात घरोघरी पालखीचे दर्शनानंतर रात्री दोनच्या दरम्यान पालखी मंदीत पोहचल्यानंतर घोडवली येथील डॉ.नितीन वसंत पाटील यांच्या कुटूंबियांच्या हस्ते महापूजा केल्यानंतर भाविकांना दर्शन घेण्यासाठी सोडण्यात आले आहे. दिवसभरात सावरोली, खरसुंडी पंचक्रोशी, चौक विभाग, महड गाव आणि बीड जांबरूग येथून पालखीचे आगमन मंदीत झाले होते.
 
कोरोनाना प्रार्दुभाव लक्षात घेत शासनाच्या नियमांच्या आधिन राहत भाविकांना दर्शनासाठी सोडताना मुख्य प्रवेशद्वार येथे सँनिटाईझर, माक्स वापरणे बंधनकारक ठेवले असून सामाजिक अंतर पाळला जात असल्याची माहिती देवस्थान कमिटीचे सदस्य जयवंत पाटील यांनी दिली आहे. कार्तिकी एकादशी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधून भाविक दर्शनासाठी येतात मात्र कोरोनाच्या संकटामुळे रेल्वे सेवा बंद असल्यामुळे भाविक यावर्षी दर्शनासाठी येवू शकले नसल्याची खंत देवस्थान कमिटीने व्यक्त केली आहे. तर मंदीरात गर्दी न होता भाविकांना दर्शन घेण्यासाठी आडचण होवू यासाठी धाकटी पंढरी देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष आर.एस.पाटील, सेक्रेटरी नारायण पाटील, सदस्य अँड. रामदास पाटील, अतुल पाटील, जयवंत पाटील, संदेश पाटील, व्यवस्थापक मारूती पाटील तसेच सर्व सदस्य तसेच खोपोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक धनाजी क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तर खोपोली पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी आरोग्याच्या दृष्टिकोणात आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
 
कार्तिकी एकादशी पासून सुरु होणारी यात्रा पंधरा दिवस चालते. यावेळी करोडो रुपयांची उलाढाल होऊन शेकडो कुटुंबांचा उदर निर्वाह होतो. दरम्यान विविध उद्योग धंदे लागल्याने एक वेगळीच रेलचेल पहायला मिळते. परंतु यंदा कोरोनामुळे सर्वांचेच धाबे दणाणल्यामुळे यात्रा रद्द झाली असून फक्त दर्शनाची संधी भाविकांना देण्यात येत आहे