रायगड : जवाहर नवोदय विद्यालयात सहावी, नववीसाठी प्रवेश घ्यायचाय?

By Raigad Times    25-Nov-2020
Total Views |
 Jawahar Navodaya Vidyala
 
  • ...येथे भरा परिक्षेचे ऑनलाईन अर्ज
  • अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर
अलिबाग । भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाद्वारे संचलित माणगाव तालुक्यातील निजामपूर येथील जवाहर नवोदय विद्यालय वर्ष 2021-22 साठी इयत्ता सहावी व नववीमध्ये प्रवेश घेण्यासाठी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख 15 डिसेंबर आहे.
 
सहावीत प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन परिक्षेचे अर्ज https://navodaya.gov.in/nvs/en/Home१ या किंवा https://cbseitms.in/nvsregn/index.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तर नववीकरिता प्रवेश घेण्यासाठी परिक्षेचे अर्ज  www.navodaya.gov.in या किंवा https://www.nvsadmissionclassnine.in/nvs/homepage या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
 
सहावीत प्रवेश घेण्यासाठी....
इयत्ता पाचवीत शिकत असलेले आणि 1 मे 2008 ते 30 एप्रिल 2012 (दोन्ही दिवस धरुन) यादरम्यान जन्मतारीख असलेले विद्यार्थी यासाठी अर्ज भरण्यास पात्र आहेत. परीक्षा 10 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11 वाजता रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ठरलेल्या केंद्रावर होईल.
 
जिल्ह्यातील पाचवीमध्ये शिकत असलेल्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी याची नोंद घ्यावी तसेच अधिक माहितीसाठी नवोदय स्टाफ संतोष चिंचकर (मो.9881351601), कैलास वाघ (मो.9527256185), राकेश कुमार मीणा (मो.9146156642), लक्ष्मण तिगोटे (मो.9421169088) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी प्राध्यापक प्राचार्य एस.व्ही. बोभाटे यांनी केले आहे.
 
नववीमध्ये प्रवेश घेण्यासाठी....
यावर्षी इयत्ता आठवीत शिकत असलेले आणि 1 मे 2005 ते 30 एप्रिल 2009 (दोन्ही दिवस धरून) या दरम्यान जन्मतारीख असलेले विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. परीक्षा 13 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 9:30 वाजता जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर येथे होईल.
 
रायगड जिल्ह्यातील आठवीमध्ये शिकत असलेल्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी याची नोंद घ्यावी. तसेच अधिक माहितीसाठी नवोदय स्टाफ संतोष चिंचकर मो.9881351601, कैलास वाघ मो.9527256185 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राध्यापक प्राचार्य एस.व्ही.बोभाटे यांनी केले आहे.