रेल्वेच्या धडकेने रोहे-गोवे येथे इसमाचा मृत्यू !

By Raigad Times    24-Nov-2020
Total Views |
kolad railway accident_1&
 
कोलाड । रोहे तालुक्यातील गोवे हद्दीत यशवंत नगर आदिवासी वाडी नवीन गावठाण येथील 40 वर्षीय ईसमाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची दूदैवी घटना घडली आहे.
 
यशवंत नगर आदिवासी वाडी नविन गावठाण येथील अंकुश हरेश जाधव वय (40) हे रविवारी दि. 22 नोव्हेंबर रोजी गोवे हद्दीत जवळ आले त्यांना रेल्वेची धडक लागून मुत्यु झाला आहे.
 
या घटनेचा तपास कोलाड पोलीस सपोनि सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पी जी पाटील करीत असून, कोलाड पोलिसात या अपघाताची नोंद अकस्मात मृत्यू अशी करण्यात आली आहे.