रायगड जिल्ह्यात शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये अंश म्हात्रे अव्वल

By Raigad Times    24-Nov-2020
Total Views |
Ansh mhatre_1  
 
केंद्रिय जवाहर नवोदय परिक्षेमध्ये जिल्ह्यात तृतीय; सर्व स्थरातून कौतुक व अभिनंदन
 
पाली/बेणसे । दादरगावचे सुपुत्र व सध्या बोर्वे प्राथमिक शाळेचे आदर्श शिक्षक विनोद दामोदर म्हात्रे यांचे सुपुत्र अंश विनोद म्हात्रे याने फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये तब्बल नव्वद टक्के गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. तसेच राज्य गुणवत्ता यादीमध्ये त्याने 18 वा क्रमांक मिळवला आहे. याबरोबरच नुकत्याच झालेल्या केंद्रिय जवाहर नवोदय परिक्षेमध्येही अंश जिल्ह्यात तिसरा आला आहे. या यशाबद्दल अंशचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
 
अंशचे मार्गदर्शक पडळकर यांनी सांगितले की, अंश मुळातच अभ्यासू व जिज्ञासू असल्यामुळे एखादी नवीन संकल्पना शिकवल्यानंतर तो स्वतः मेहनत घेवून सखोलपणे अभ्यास करतो हेच त्याच्या यशाचे गमक आहे. या यशात माझे पालक, गुरुजनवर्ग यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले असल्याचे अंश म्हणाला. शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुहासिनी देव, जिल्हा परिषद सदस्य डि.बी. पाटील, विस्तार अधिकारी अशोक पाटील, केंद्रप्रमूख ज.स.म्हात्रे, विठोबा पाटील, किशोर पाटील व दत्तात्रेय कोठेकर यांनी अंशचे अभिनंदन केले आहे.