क्रिकेट सामने खेळवण्यास परवानगी द्या; रायगडातील क्रिकेट संघटनांची मागणी

By Raigad Times    24-Nov-2020
Total Views |
rohe cricket_1  
 
कोलाड । कोरोनामुळे मार्च महिन्यापासून मैदानी खेळ बंद आहेत, आता या आजाराचा प्रादुर्भाव रोहे तालुक्यात कमी दिसून येत असून, मैदानी क्रिकेट खेळण्याची व सामने आयोजित करण्याची परवानगी मिळावी, अशा प्रकारचे निवेदन तालुक्यातील सर्व क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संकेत देशमुख यांनी रोहे तहसीलदार कविता जाधव यांना दिले आहे.
 
कोरोनामुळे सर्वच मैदानी खेळांना राज्यात बंदी होती. त्यामुळे क्रिकेटपटूचा हिरमोड झाला होता.परंतु आता गेल्या काही
दिवसांपासून या आजाराचा प्रादुर्भाव कमी दिसून येत असून, आम्हाला रोहे तालुक्यात कोरोना काळातील सर्व नियम,अटी पाळून, मैदानी खेळ व सामने आयोजित करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी रोहे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संकेत देशमुख यांनी केली आहे.
 
यावेळी कोलाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बाळा महाबळे, नागोठणे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजेश पिंगळे,स्वयंभू क्रिकेट असोसिएशनचे टूटरोली अध्यक्ष सचिन साळवी, चणेरा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश पवार, गोवे खांब क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण धामनसे यांनी दिले आहे.