1 जानेवारी 2021 च्या अर्हता दिनांकावर मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर

By Raigad Times    23-Nov-2020
Total Views |
matdan nondani_1 &nb
 
अलिबाग । भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी, 2021 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयादीचा पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.
 
दि.17 नोव्हेंबर, 2020 ते 15 डिसेंबर, 2020-हरकती व दावे स्विकारले जातील. मतदारयादीत नाव समाविष्ट होण्यासाठी त्यांनी फॉर्म नं.06 भरुन देणे आवश्यक आहे. मयत व स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करण्यासाठी फॉर्म नं.07 तसेच मतदारयादीत वय, लिंग, नाव यामध्ये दुरुस्ती असेल तर फॉर्म नं.08 भरुन दयावयाचा आहे. या नाव नोंदणीत ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी www.nvsp.in या पोर्टलचा वापर करता येईल.
 
अंतिम मतदारयादी दि.15 जानेवारी 2021 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. मतदारयादीत नवीन मतदारांची नावे समाविष्ट करणे अथवा नोंदी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करावेत, असे आवाहन अलिबाग तहसिलदार तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी सचिन शेजाळ यांनी केले आहे.