मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांची गोळी झाडून हत्या

By Raigad Times    23-Nov-2020
Total Views |
 mns_1  H x W: 0
ठाणे: राबोडी भागातील मनसेचेे पदाधिकारी जमील शेख यांची अज्ञात इसमानी गोळी झाडून हत्या केली आहे. बाइकवरून निघाले असताना त्यांच्यावर एक गोळी झाडण्यात आली. ती वर्मी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
 
जमील शेख हे आज भरदुपारी बाइकवरुन निघाले होते. त्यावेळी पाठीमागून बाइकवरून आलेल्या दोन जणांपैकी बाइकवर मागे बसलेल्या एकाने जमील यांच्यावर गोळी झाडली. डोक्याच्या मागे गोळी लागल्याने जमील हे बाइकसह खाली कोसळले.
 
त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वाटेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. जमील हे मनसेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष होते. जमील यांच्यावर गोळ्या झाडून हल्लेखोर पसार झाले आरोपींचा गुन्हे शाखेकडूनही शोध घेण्यात येत आहे.