कोरोना अपडेट : रायगडात 89 नवे रुग्ण; 3 मृत्यू

By Raigad Times    23-Nov-2020
Total Views |
Raigad Corona Update 23_1
 
दिवसभरात 66 रुग्णांची कोरोनावर मात
 
अलिबाग । रायगडात आज कोरोनाच्या 89 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, तीन रुग्णांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 66 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. आजअखेर जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांपैकी 95 टक्के कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
 
आजअखेर जिल्ह्यात एकूण 56 हजार 256 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 53 हजार 741 रुग्ण कोरोनावर मात करुन सुखरुप घरी परतले. तर दुर्दैवाने 1 हजार 597 रुग्णांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरल्याने त्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के तर मृत्यूंचे प्रमाण हे 3 टक्के आहे. सद्यस्थितीत केवळ 2 टक्के म्हणजेच 918 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
 
आज (23 नोव्हेंबर) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या व मृत्यू झालेल्या रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :

Raigad Corona Update 23_1