कोलाडः मालवाहू ट्रक घुसला टपरीत

By Raigad Times    22-Nov-2020
Total Views |
kolad_1  H x W:
 
कोलाड । मुंबई - गोवा महामार्गवरील कोलाड खांब नाक्यावरील एका टपरीवर केमिकल वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली असून, टपरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
 
kolad_1  H x W:
 
आज (22नोव्हेंबर) दुपारच्या सुमारास एक ट्रक चालक मुंबई गोवा महामार्गावरून केमिकलचे ड्रम घेऊन कोलाडकडून मुंबईकडे जात होता. ट्रक खांब हद्दीत नाक्याजवळ आला असता एका भरधाव असणार्‍या वाहनाला वाचवण्याच्या नादात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि मंगेश पोटफोटो यांच्या टपरीवर ट्रक पलटी झाला. सुदैवाने जीवितहानी टळली आहे. टपरीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.