पाली : अ‍ॅपे रिक्षा-मोटारसायकलची धडक; दोन्ही वाहनचालक जखमी

By Raigad Times    22-Nov-2020
Total Views |
Road Accident_1 &nbs 
 
करचुंडे मार्गावरील घटना
 
धम्मशील सावंत/पाली-बेणसे । करचुंडे मार्गावर अ‍ॅपे रिक्षा व मोटारसायकलची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनचालक जखमी झाले. ही दुर्घटना आज (22 नोव्हेंबर) घडली.
 
याबाबत अ‍ॅपे रिक्षा चालकाने पाली पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत शिंदे (49), रा.उंबरवाडी, ता. सुधागड) हे त्यांची अ‍ॅपे रिक्षा घेऊन जात होते. यावेळी रिक्षात पाठीमागील सीटवर जयश्री शिंदे, प्रवीण वाघमारे, पिंकी वाघमारे आदी प्रवासी बसले होते.
 
रिक्षा करचुंडे गावच्या हद्दीतील छोट्या पुलाजवळ आली असता समोरुन ट्रीपल सीट आलेल्या मोटरसायकलने रिक्षाला धडक दिली. या अपघातात अ‍ॅपे रिक्षा चालक चंद्रकांत शिंदे व मोटरसायकलस्वार सागर बबन वाघमारे दोघे जखमी झाले आहेत. सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
 
अपघाताची नोंद पाली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पाली पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक के एन भोईर करीत आहेत.