आयएन-एमडीएल चषक : पहिली राष्ट्रीय नौकानयन अजिंक्यपद स्पर्धा 22 नोव्हेंबरपासून मुंबईत सुरु होणार

By Raigad Times    21-Nov-2020
Total Views |
sailing competition india
 
मुंबई : मुंबईतील इंडियन नेव्हल वॉटरमनशिप ट्रेनिंग सेंटर (आयएनडब्ल्यूटीसी), पहिली आयएन-एमडीएल चषक ही राष्ट्रीय नौकानयन अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करून नौकानयन क्रीडास्पर्धांची सुरुवात करत आहे. भारतीय नौकानयन संघटना (वायएआय)च्या अधिपत्याखाली सर्व वरिष्ठ ऑलिम्पिक श्रेणीसाठी पहिल्या आयएन-एमडीएल चषक 2020 चे आयोजन करण्यात आले आहे.
 
देशात नौकानयन क्रीडाप्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय नौदल नौकानयन संघटनेचे आश्रयदाते म्हणून, नौदल प्रमुख ऍडमिरल करमबीर सिंह यांच्या आदेशानुसार माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) यांनी वार्षिक आयएन-एमडीएल चषक स्पर्धा प्रायोजित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
 
भारतीय नौकानयन संघटना (वायएआय)च्या अधिपत्याखाली सर्व वरिष्ठ ऑलिम्पिक श्रेणीसाठी पहिल्या आयएन-एमडीएल चषक 2020 चे आयोजन करण्यात आले आहे. या नौकानयन स्पर्धेत रँकिंग असेल आणि 22-27 नोव्हेंबर दरम्यान संक रॉक लाइट हाऊसजवळ आयोजित केली जाईल. महामारीच्या प्रादुर्भावानंतर पुन्हा एकदा मुंबई बंदरात नौकाविहाराला सुरुवात होईल आणि अनेक नौका ही स्पर्धा जिंकण्याच्या इर्षेने उतरतील.
 
आयएन-एमडीएल चषक स्पर्धेत देशभरातील 12 नौकानयन क्लब - आयएनडब्ल्यूटीसी (एमबीआय), आयएनडब्ल्यूटीसी (गोवा), आयएनडब्ल्यूटीसी (हमला), आर्मी यॉटिंग नोड, ईएमईएससी (भोपाळ), ईएमईएसए, सीईएससी, तामिळनाडू सेलिंग असोसिएशन, जीवायए, राष्ट्रीय संरक्षण अकादमी, खडकवासला, एनएसएस भोपाळ आणि एनएसएन भोपाळ सहभागी होणार आहेत.
 
या स्पर्धेत 49 स्किफ, 470, लेझर आणि आरएस: एक्स क्लास विंडसर्फर या बोटींच्या चार मूलभूत श्रेणी असतील. वरिष्ठ गटाच्या इतिहासात प्रथमच 470 मिश्रित श्रेणीचा सहभाग असेल. विशेष म्हणजे तरुण मुली आणि महिला सहभागींची संख्या ही लक्षणीय आहे जी उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल. 22 नोव्हेंबर 20 रोजी हा कार्यक्रम आयएनडब्ल्यूटीसी, कुलाबा, मुंबई येथे महाराष्ट्र क्षेत्राचे ध्वज अधिकारी ही स्पर्धा सुरु झाल्याचे जाहीर करतील.
 
पुढील प्रकारच्या नौका गटात शर्यती होतील :
  • लेझर स्टॅंडर्ड (पुरुष)
  • लेझर रेडियल (महिला)
  • 470 (पुरुष / महिला / मिश्र)
  • 49er (पुरुष)
  • 49er FX (महिला)
  • आरएस: एक्स (पुरुष / महिला)
  • फिन