पनवेल प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी पुन्हा सय्यद अकबर

By Raigad Times    21-Nov-2020
Total Views |
panvel patrkar_1 &nb
 
राज भंडारी पुन्हा एकदा सरचिटणीस पदी
 
पनवेल । पनवेल प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा पत्रकार सय्यद अकबर यांची निवड करण्यात आली आहे. तर राज भंडारी यांची पुन्हा एकदा सरचिटणीस पदी निवड करण्यात आले आहे. या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज (21 नोव्हेंबर) शनिवारी संस्थेचे संस्थापक विजय कडू, संतोष घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडली.
 
सभेमध्ये नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी पनवेलच्या इतिहासात नमूद करण्यासारखी गोष्ट पनवेल प्रेस क्लबच्या माध्यमातून करून पहिल्यांदाच महिलांचे संघटन उभे करून नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला आहे.
 संघटनेच्या माध्यमातून नागरिकांवर येणार्‍या अडचणी सोडविण्यासह गोरगरीब जनतेला मदत करण्याची हमी संघटनेच्यावतीने घेण्यात आली. तसेच तालुक्यातील आदिवासी वाड्या, वृद्धाश्रम आणि दुर्बल घटकांना मदत करण्यासह संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील असा विश्वासही संघटनेचे अध्यक्ष सय्यद अकबर यांनी व्यक्त केला. 
 
यावेळी महिला आघाडी प्रमुख पत्रकार सुमेधा लिम्हण यांनी बोलताना पनवेल प्रेस क्लब बाबत कृतज्ञता व्यक्त केली, त्या म्हणाल्या आज सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपले काम करीत आहेत, मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रातही महिलांना बातम्या बनविण्यापर्यंत मर्यादित ठेवले जात होते. मात्र पनवेल प्रेस क्लबच्या माध्यमातून आम्हाला पदे देवून आमचा तसेच समस्त महिला प्रवर्गाचा सन्मान केला आहे.
 
पनवेल प्रेस क्लबचे संस्थापक विजय कडू, संतोष घरत यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आलेल्या नूतन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी सय्यद अकबर, कार्याध्यक्ष पदी प्रकाश म्हात्रे, उपाध्यक्षपदी गणपत वरागडा, देविदास गायकवाड, भरत कुमार कांबळे, सरचिटणीस पदी राज भंडारी, सह चिटणीस पदी आप्पासाहेब मगर, विकास पाटील, खजिनदार पदी अनिल राय, संघटक पदी साहिल रेळेकर, सह संघटक पदी संतोष वाव्हळ, सल्लागार पदी संतोष घरत, महिला आघाडी प्रमुख सुमेधा लिम्हण, सहप्रमुख धनश्री सट्टा, प्रसिद्धी प्रमुख सनिप कलोते तर सदस्यपदी दीपक पळसुले, क्षितिज कडू, विशाल सावंत, रविंद्र चौधरी, जितेंद्र नटे, प्रदीप ठाकरे, असीम शेख, साबीर शेख, शंकर वायदंडे, राजेंद्र कांबळे, प्रमोद जाधव या सदस्यांची निवड करण्यात आली.