सुशील यादव/म्हसळा : म्हसळा नगरपंचायतीची आगामी निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार असल्याची माहिती भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी दिली. गेल्या चार वर्षांत राष्ट्रवादी म्हसळा शहराचा विकास करण्यात पुर्णतः अपयशी ठरली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
रायगड जिल्ह्यात भाजपा खासदार सुनिल तटकरे यांचे विरोधात नेहमी लढा देत राहील असे सांगताना निवडणुका आल्या की ते पैसा आणि भूमिपूजन करण्याची कामे करून लोकांवर भुल पाडतात.त्यांचे परिवारातील तीन सदस्य लोकप्रतिनिधीत्व करीत वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय प्रसार करतात त्याला केवळ भाजपच विरोध करून सामोरे जाईल अशी भूमिका व्यक्त करताना आता तालुक्यातील गावा,गावात आमच्या पक्षाचा कार्यकर्ता तयारीत आसुन आम्ही विरोधाची ठोस भूमिका पार पाडुच आणि प्रत्येक निवडणुकीला सामोरे जावु असा विश्वास कोबनाक यांनी व्यक्त केला.
मला राजकारणातून सामाजिक सेवा करण्याची आवड आहे मी तालुक्यातील विकासाबाबत माझे सातत्यपूर्ण काम चालु ठेवणार असे कोबनाक यांनी सांगताना म्हसळा शहरातील समस्या व तक्रारींबाबत येत्या सोमवार पासुन शहरात नगरपंचयतीने पाच वर्षे कोणते प्रकल्प,उपक्रम राबविले त्या बाबतीत चौकशी आणि विकास कामांचा आढावा घेणार आहोत.विकासा बाबतीत म्हसळा तालुका भाजपाने 10 प्रश्नांची परिपत्रके तयार करून त्या माध्यमातून लोकांची थेट प्रतिक्रिया नोंदवून जनते समोर संमेलनाचे माध्यमातून संवाद साधणार असल्याचे कोबनाक यांनी सांगितले.
आम्ही महाराष्ट्र राज्यातील सत्तेत असताना आम्हाला म्हसळा शहरात काही ठोस कामे करता आली नाही कारण आमच्याकडे कार्यकर्त्यांचा अभाव होता.आता मागे काय झाले याचा उकल करीत न बसता आगामी नगर पंचायत मध्ये स्वच्छ व पारदर्शक कारभारासाठी सुशिक्षित आणि अभ्यासु लोकप्रतिनिधी निवडुन देण्यासाठी म्हसळा निवासी जागृत नागरिकांनी जातीधर्म,पक्षपात बाजुला ठेवुन भाजप मोहिमेत सहभागी व्हावे.
म्हसळा शहराचे पारदर्शक कारभारासाठी निवडणुकीत युवकांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती कृष्णा कोबनाक यांनी वार्तालाप करताना दिली.म्हसळा तालुका भाजपचे पक्ष कार्यालयात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा उपाध्यक्ष कोबनाक यांच्या समावेत तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर,शहर अध्यक्ष संतोष पानसरे,विभाग अध्यक्ष अनिल टिंगरे,अल्पसंख्याक सेल अध्यक्ष समीर धनसे उपस्थित होते.