पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार

20 Nov 2020 23:19:59
schools closed_1 &nb 
 
आयुक्त सुधाकर देशमुख यांचे संबंधित यंत्रणांना आदेश
 
अलिबाग : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद राहणार आहेत. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना सदर निर्देश दिले होते. त्याप्रमाणे आयुक्त देशमुख यांनी संबंधित यंत्रणांना आदेश दिले आहेत.
 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सध्या आटोक्यात असला तरी दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या काळात कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. या दृष्टीने पुढील ४ ते ६ आठवडे खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री तटकरे यांनी आयुक्त यांच्याशी चर्चा केल्यानंतर सदर निर्णय घेण्यात आला आहे. २३ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शाळा आता ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत.
 
नियमितपणे ऑनलाईन क्लासेस तसेच अन्य उपक्रम सुरु असणार आहेत. शालेय शिक्षण विभागाकडून 30 ऑक्टोबरनंतर शाळांमध्ये 50 टक्के शिक्षकांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच शिक्षकांनी शाळेत ऑनलाईन शैक्षणिक अभ्यासक्रम, विविध उपक्रम, पर्यायी शिक्षण या सर्व बाबींवर काम करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.त्यांचे पालन करणे संबंधित शाळा प्रशासनावर बंधनकारक असेल.
 
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच दहावी तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावी यांच्या परीक्षा पुर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणेच सुरु राहतील.
Powered By Sangraha 9.0