रोजगाराची सुवर्णसंधी! २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

By Raigad Times    20-Nov-2020
Total Views |
Rojgar Melava_1 &nbs 
 
नोंदणी करायला विसरु नका...
 
अलिबाग : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील कुशल, अकुशल उमेदवारांसाठी २४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
 
हा मेळावा २४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. जिल्ह्यातील ज्या उमेदवारांनी https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर या वेबपोर्टलवरील Employment-Job Seeker (Find a Job)-Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील आपली सर्व माहिती अद्ययावत करावी.
 
ज्यांनी या विभागाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर Employment-Job Seeker (Find a Job)-Register या ऑप्शन्सवर क्लीक करुन सर्व अद्ययावत माहिती भरुन नवीन नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर नोंदणी करताना भरलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास प्राप्त झालेला नोंदणी क्रमांक व पासवर्ड वापरुन वेबपोर्टलवरील Employment-Job Seeker (Find a Job)-Jobseeker Login मध्ये Registration Id (नोंदणी क्रमांक) व पासवर्ड भरुन Login वर क्लीक करावे.
 
त्यानंतर दिसणाऱ्या आपल्या नोंदणीच्या माहितीतील Pandit Dindayal Upadhyay Job Fair वर क्लीक करुन दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील आपला जिल्हा निवडून Action-view details मध्ये रोजगार मेळाव्याची माहिती पहावी व vacancy listing मध्ये रिक्तपदांची माहिती पाहून Apply ऑप्शनवर क्लीक करावे. त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होतो.
 
रिक्त पदांकरिता Apply वर क्लीक केल्यानंतर संबंधीत उद्योजकास वेबपोर्टलवर इच्छूक उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक इ. माहिती प्राप्त होते. त्यामुळे त्यांचेकडील रिक्तपदांकरीता ऑनलाईन पध्दतीने मुलाखत घेण्याकरिता आपणाशी संपर्क साधणे शक्य होते.
 
पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी काही समस्या येत असेल तर या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 या वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त शा. गि. पवार यांनी केले आहे.