अ‍ॅक्टिव्हामध्ये घुसला भलामोठा साप

20 Nov 2020 14:45:34
Tala 2_1  H x W
 
विराज टिळक/तळा । आपण जर गाडी चालवत असाल आणि आपल्याला रस्त्यात साप दिसला तर सावध राहा कारण तळा शहरात आज एक विचित्र घटना घडली तळा शहरातील तळा तहसील कार्यालयातून अ‍ॅक्टिव्हा स्कुटर (गाडी नंबर एमएच ०६ बी एन ९२६०) घेऊन निघालेल्या समीर वसंत मोरे यांना काही अंतरावर रस्त्यावर साप दिसला साप रस्त्याच्या बाजूला असल्याने त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि गाडी पुढे घेऊन निघाले.

Tala 1_1  H x W 
 
पण काही क्षणातच तो साधारण पाच फूट लांबीचा साप चालू असलेल्या स्कुटर मध्ये घुसला. चालकाने मागे बघितलं असता साप निदर्शनात न आल्याने त्याने त्यांची स्कुटर चेक केली तर त्याच स्कुटर मध्ये तो साप सीटच्या खाली आढळून आला. साप गाडीत असल्याने समीर वसंत मोरे यांची पाचावर धारण बसली सुमारे पंधरा मिनिट साप त्याच गाडीत होता, काही काळाने तो साप नजीर पठाण यांनी अथक परिश्रम करून बाहेर काढला तेव्हा स्कुटर चालकाने सुटकेचा निश्वास सोडला.
 
Powered By Sangraha 9.0