गोवठणे गावात जागेच्या वादातून चौघांवर चाकूने हल्ला

By Raigad Times    19-Nov-2020
Total Views |
CHAKU HALLA_1  
 
दोघांना अटक; इतर आरोपी फरार
 
जेएनपीटी । सख्खे शेजारी पक्के वैरी म्हणतात तशी घटना उरण तालुक्यातील गोवठणे गावात घडली. शेजारी शेजारी राहणार्‍या दोन कुटूंबात गुरूवारी (दि.12) रोजी किरकोळ वाद झाला. या वादात एका शेजार्‍याने दुसर्‍या शेजार्‍याच्या घरातील चार जणांवर चाकूने हल्ला केला. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या आणखी एका शेजार्‍याला देखिल चाकू लागल्याने तो जखमी झाला.
 
या बाबत उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या गुन्ह्या संदर्भात दोघांना ताब्यात घेतले असून सरकारी सेवेत असणार्‍या सुनील परशुराम म्हात्रे या आरोपीला उरण पोलीसांनी फरार असल्याचे घोषित केले आहे.
 
उरण तालुक्यातील गोवठणे गावातील साईनाथ गणेश म्हात्रे यांच्या अंगणात लादी बसविण्याचे काम सुरू असल्याच्या कारणावरून बाळकृष्ण लडग्या म्हात्रे यांच्या हा वाद झाला. या वादात बाळकृष्ण म्हात्रे यानी साईनाथ, त्याचे वडील गणेश, आई आणि बहिणीवर चाकूने वार केले. हे भांडण सोडविण्यासाठी शेजारी असणारे प्रफुल्ल म्हात्रे हे गेले असता त्यांना देखिल चाकू लागला असल्याची तक्रार साईनाथ म्हात्रे यांनी उरण पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
 
उरण पोलिसांनी दोन आरोपीना अटक केली असून सरकारी सेवेत असणार्‍या आरोपीला उरण पोलीसांनी फरार असल्याचे घोषित केले आहे. एकंदरीत पोलीस यंत्रणा आरोपीला अभय देण्याचे काम करत असल्याच्या संशयावरून गावात आज ही दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या तपासात सवश्य याची भावना निर्माण झाली आहे.