कर्जत : रेल्वे अपघातात तरुणीचा मृत्यू

18 Nov 2020 15:13:55
Karjat Accident_1 &n 
 
ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरुच
 
कर्जत : भिवपुरी रोड ते नेरळ स्टेशनदरम्यान रेल्वे अपघातात 25 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या तरुणीची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.
 
16 नोव्हेंबर रोजी रात्री 10.45 वाजता 90/4 कि. मी. नंबर जवळ एक अनोळखी तरुणी वय अंदाजे 25 वर्षे ही रेल्वे अपघातात मयत झाली. तिचे नाव, पत्ता समजू शकलेले नाही. तसेच तिच्याकडे ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू मिळून आली नाही.
 
तरुणीचे वर्णन वय - 25 वर्षे अंदाजे, वर्ण- गोरा, अंगाने मजबूत, चेहरा - उभट, नाक- सरळ छोटे, केस- काळे लांब, नेसणीस- सफेद रंगाचा त्यावर फुलांची नक्षी असलेला टॉप, आकाशी रंगाची ली कूपर कंपनीची जीन्स पॅन्ट आहे.
 
तरी सदर तरुणीबाबत काही एक माहिती मिळाल्यास कर्जत रेल्वे पोलीस स्टेशन येथे किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक सरकाळे (मोबा. 9881711340), पोलीस कर्मचारी गांगुर्डे (मोबा. 9881777109), पोलीस कर्मचारी पाटील (मो. 9767888056) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0