फार्मा कंपनीचे स्वागत; पण स्थानिकांना विश्वासात घ्या! - शेकाप नेते आ. जयंत पाटील

By Raigad Times    12-Nov-2020
Total Views |
jayant patil_1  
 
अलिबाग/ मुरुड जंजिरा । रोहा-मुरुड परिसरात सिडकोचा प्रोजेक्ट येणार म्हणून स्थानिकांच्या जमिनी दलालानी कवडीमोलाने घेतल्या. आता त्या एमआयडीसीला देवून हे दलाल मालामाल होणार आहेत. आमचा विकासाला विरोध नाही मात्र येणार्‍या कंपनीचा फायदा हा स्थानिकांना झालाच पाहीजे अशी भुमिका शेकापनेते आ. जयंत पाटील यांनी मांडली आहे.
 
अलिबाग, मुरुड आणि रोहा या तीन तालुक्याच्या सिमेवर चणेरे विभागात फार्मा कंपनी उभारण्यात येणार आहे. त्यासंबधीची अधिसुचना जाहिर झाल्यानंतर लोकांमध्ये सभ्रम निर्माण झाला. स्थानिकांना सरकारने विश्वासत न घेतल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे.
 
jayant patil_1  
 
यापार्श्वभुमिवर शेकापनेते आ. जयंत पाटील यांनी बुधवारी (11 नोव्हेंबर) रोजी न्हावे येथील श्रीराम मंदिरात गावकर्‍यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेकापची भुमिका स्पष्ट केली.
 
रोहा-मुरुड भागात प्रथम सिडको क्षेत्र घोषित करण्यात आले. होते. त्यात बद्दल करून एमआयडीसी झोन जाहीर केला असून या ठिकणी आता फार्मा कंपनी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसे झाले तर येथे मोठ्याप्रमाणात प्रदूषण होण्याची भिती आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
 
सरकारने स्थानिक शेतकर्‍यांना विश्वासात घेतले पाहीजे. अन्यथा एक हि गाव उठवून देणार नाही असे सांगतानाच, वेळप्रसंगी रोहा तहसील कार्यालयाजवळ मशाल मोर्चा काढण्याचा इशारा आ. जयंत पाटील यांनी दिला आहे. स्थानिक शेतकर्‍यांच्या जमिनीला सिडकोप्रमाणे दर घोषित करा अशी मागणीही त्यांनी केली.
 
एमआयडीसी स्थानिक शेतकर्‍यांच्या जमीनी अल्प भावात खरेदी करून स्वतः मात्र औषध कंपन्यांकडून मोठा भाव घेणार आहे. या ठिकाणी खोटे व्यवहार झाले आहेत. याची तपासणी झाली पाहिजे. ज्यांनी या भागात जमीनी विकत घेतल्या आहेत त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले याचा तपास ईडी मार्फत करण्यात यावा अशी मागणी आपण शासनाकडे करणार असल्याचे यावेळी पाटील म्हणाले.
 
यावेळी व्यासपीठावर रोहा पंचायत समिती सभापती गुलाब वाघमारे, न्हावे सरपंच राजश्री शाबासकर, समाज कल्याण सभापती दिलीप भोईर, शेकापचे जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, मुरुड तालुका चिटणीस मनोज भगत रोहा तालुका चिटणीस राजेश सानप हेमंत ठाकूर सुरेश तांडेल विद्याधर चोरघे विजय गीदी अजित कासार नगरसेवक आशिष दिवेकर आदी उपस्थित होते.