कोकण रेल्वे दुपदरीकरणाच्या कामाला ‘वेग’

12 Nov 2020 16:33:23
konkan railway_1 &nb
 
क्रॉसिंग स्टेशनमुळे मुंबई - गोवा प्रवास कांही तासावर
 
माणगाव । कोकण रेल्वे मार्गावरील दुपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. कोकण रेल्वेचा प्रवास सुरक्षित व अधिक जलद व्हावा यासाठी पाच नवीनक्रासिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरु असून त्याचेही काम अंतिम टप्प्यात आले आहे.
 
रायगड जिल्हयातिल इंदापूर रेल्वे स्थानकाचा दर्जा वाढवण्याचे आणि क्रासिंग स्टेशन उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. सुधारीत स्थानकात प्रतिक्षागृह, आरक्षण कक्ष व इतर सुविधांचाही समावेश इंदापूर रेल्वे स्थानकात करण्यात आला आहे. त्याचबरेबर गोरेगाव रेल्वे स्थानकाचेही काम अंतिम टप्प्यात आले असून दुपदरीकरणाचे कामही वेगात सूरू आहे.
 
माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेचा प्रवास सुरक्षित व जलदगतीने व्हावा यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून 5 नवीन का्रॅसिंग स्टेषन उभारण्याचे काम हाती घेतले असून यापैकी तीन रेल्वे स्टेशन हे रायगड जिल्हात आहेत. त्यापैकी एक माणगांव तालुक्यातील इंदापूर येथे आहे.
 
माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केंद्रात कोकणी माणसाचा प्रवास आरामदायक बनवण्यासाठी तसेच पर्यटनासाठी अधिकाधिक रेल्वे सूरक्षा देण्यासाठी रेल्वे मार्गाचे दूपदरीकरण विद्युतीकरण व 11 नवीन स्थानकाच्या बांधकामाचा निर्णय आपल्या रेल्वे मंत्रीपदाच्या कारकिर्दीत घेतला होता.
 
रायगड जिल्हयात इंदापूर, गोरेगावसारखी अनेक स्थानके गैरसोई युक्त आहेत. या ठिकाणी कोणत्याही सुविधा कोकण रेल्वे कडून या पूर्वी देण्यात आल्या नाहीत. या स्तःन्काचा विचार करून या स्थानकाचा दर्जा वाढवण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्यामध्ये रायगड मधील इंदापूरचा व रत्नागिरी जिल्ह्यातील वेरवली स्थानकाचा समावेष करण्यात आला होता.
 
जलद व आरामदाई प्रवासासाठी या महत्वाच्या रेल्वे स्थानकांत क्रासिंग स्टेशन उभारून कोकण रेल्वेला अपडेट करीत गती देण्याचे काम हाती घेतले होते. कोलाड आणि माणगांवच्यामध्ये इंदापूर रोड स्टेशन आहे. त्या ठिकाणी क्रासिंग स्टेशन बांधण्यात आले असून वीर करंजाडी स्टेशनमध्ये असलेले सापे इंदापूर स्टेशन पासून सुमारे 55 की.मी. अंतरावर आहे.
 
वामणे येथे ही क्रासिंग स्टेशन उभारण्याची कामे वेगात सुरु आहेत. रत्नागिरी जिल्हयातील वेरवली स्टेशनचे काम हि प्रगती पथावर असून हि क्रोशिंग रेल्वे स्थानके लवकरच प्रवाशानच्या सेवेत असणार आहेत. या स्थानकामध्ये प्रतीक्षागृह, आरक्षण व्यवस्था करण्यात येणार असल्याने नागरिक, प्रवाशी पर्यटकातुन समाधान व्यक्त होत आहे.
Powered By Sangraha 9.0