उरण तालुक्यात आज कोरोनाचे 16 नवे रुग्ण

By Raigad Times    09-Oct-2020
Total Views |
 
घन:श्याम कडू/उरण । उरण तालुक्यामध्ये आज कोरोनाच्या 16 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 20 जण बरे होऊन घरी परतले. तर दिलासा देणारी बाब म्हणजे आज एकही रुग्ण दगावला नाही.
आज (8 ऑक्टोबर) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कामठा 2, कोटनाका 3, भवरा 1, बोकडविरा 1, जेएनपीटी टाऊनशिप 1, विंधणे 1, म्हात्रे वाडी करंजा रोड 4, साई किरण आनंदनगर 1, गॅलक्सी अपार्टमेंट 1, स्टार कॉम्प्लेक्स म्हातवली 1 अशा 16 रुग्णांचा समावेश आहे. तर फुंडे 2, वारीक आळी नागांव 1, पाणदिवे 1, बोरी 1, नागांव 1, डोंगरी 1, डाऊरनगर 1, पिरकोन 2, कामठा 2, उरण 2, नयन अपार्टमेंट 3, खोपटे 1, दिघोडे 2 अशा 20 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
आजअखेर उरण तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 943 झाली आहे. यापैकी 1 हजार 718 रुग्ण बरे झाले आहेत. तर 99 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 126 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.