तळा येथील पत्रकारांनी केला सफाई कामगारांचा सन्मान

By Raigad Times    26-Oct-2020
Total Views |
tala_1  H x W:
 
विराज टिळक / तळा : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन असताना आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र कर्तव्य बजावणारे पोलीस निरीक्षक, वैद्यकीय अधिकारी यांच्यासह नगरपंचायतच्या सफाई कर्मचारी यांचा तळा येथील पत्रकारांनी योध्दा म्हणून सन्मान केला.
 
कोरोना काळात पोलीस निरीक्षक वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विशेष कामगिरी बजावली तसेच आपल्या जीवाची पर्वा न करता सफाई कामगार यांनी नियमित शहराची स्वच्छता करून कोरोनाचा आकडा कमी ठेवण्यासाठी विशेष योगदान दिले.
 
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन वेब आणि टीव्ही पत्रकार संघ तळा तर्फे सर्व कर्मचार्‍यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे सल्लागार डी.टी.आंबेगावे, अध्यक्ष विराज टिळक, उपाध्यक्षा देवयानी सालेकर, कार्याध्यक्ष नजीर पठाण, सेक्रेटरी संतोष जाधव, खजिनदार श्रीकांत नांदगावकर आदी उपस्थित होते.