कोरोना अपडेट : रायगडात आज 109 नवे रुग्ण; पाच मृत्यू

26 Oct 2020 21:42:00
Raigad Corona Update_1&nb
 
दिवसभरात 233 रुग्णांची कोरोनावर मात
 
अलिबाग । रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव ओसरत चालला आहे. त्यामुळे बाधित रुग्णांच्या संख्येत समाधानकारक घट पहायला मिळते आहे. आज जिल्ह्यात 109 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 233 रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
 
आज (26 ऑक्टोबर) दिवसभरात पनवेल मनपा-95, पनवेल ग्रामीण-34, उरण-45, खालापूर-8, कर्जत-4, पेण-5, अलिबाग-13, तळा-1, म्हसळा-1, महाड-3, पोलादपूर-1 असे एकूण 233 रुग्ण कोरोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले.
 
तर पनवेल मनपा-72, पनवेल ग्रामीण-13, उरण-4, खालापूर-9, पेण-3, अलिबाग-4, मुरुड-1, रोहा-1, महाड-2 अशा 109 पॉझिटीव्ह रुग्णांची आज नोंद झाली असून, पनवेल (मनपा) क्षेत्रात 4 आणि रोह्यात 1 अशा पाच रुग्णांचा आज मृत्यू झाला.
 
सद्य:स्थितीत जिल्ह्यात पनवेल मनपा-885, पनवेल ग्रामीण-321, उरण-57, खालापूर-57, कर्जत-11, पेण-75, अलिबाग-86, मुरुड-10, माणगाव-25, तळा-0, रोहा-52, सुधागड-1, श्रीवर्धन-1, म्हसळा-5, महाड-17, पोलादपूर-2 अशी एकूण 1 हजार 605 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
 
आजअखेर रायगड जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 53 हजार 318 झाली आहे. यापैकी 50 हजार 183 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले. तर दुर्दैवाने 1 हजार 530 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 1 हजार 605 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
 
दरम्यान, जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. तर 3 टक्के रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सद्यस्थितीत उपचार घेणार्‍या रुग्णांचे प्रमाण केवळ 3 टक्केच आहे. लवकरच जिल्हा कोरोना मुक्त होईल, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.
Powered By Sangraha 9.0