लष्कर प्रमुखांनी अंबाला छावणीला दिली भेट

By Raigad Times    20-Oct-2020
Total Views |
Army chief visits Ambala  
 
नवी दिल्‍ली : लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी खर्गा कोअरच्या सुरक्षा आणि परिचालन सज्जतेचा आढावा घेण्यासाठी 19 ऑक्टोबर 2020 रोजी अंबाला छावणीला भेट दिली.
 
जनरल ऑफिसर कमांडिंग, लेफ्टनंट जनरल एस एस महाल यांनी लष्कर प्रमुखांना थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर लष्करप्रमुखांनी फॉर्मेशन कमांडर्सशी संवाद साधला. उच्च स्तरीय परिचालन सज्जतेबद्दल त्यांनी फॉर्मेशनची प्रशंसा केली आणि कोविड -19 विरोधातील लढाईत फॉर्मेशन आणि युनिट्सनी हाती घेतलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचे कौतुक केले.
 
त्यांनी सर्व पदांवरील अधिकारी आणि जवानांना उत्साहाने काम करत राहण्याचे आणि भविष्यातील कोणत्याही परिचालन आव्हानांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. लष्करप्रमुखांनी अंबाला हवाई दल तळालाही भेट दिली आणि दलांमधील समन्वयाची प्रशंसा केली.