छाया : जितू शिगवण
अलिबाग। अलिबाग शहरातील भूमिगत विद्युत वाहिन्यांच्या कामाचा शुभारंभ आज नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाअंतर्गत हे काम होणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर छोट्या-छोट्या कारणासाठी वीज जाणार नाही.
आज (17 ऑक्टोबर) साडेदहा वाजता श्रीबाग येथून कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरसेवक प्रदिप नाईक, सभापती गौतम पाटील तसेच वीज कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
समुद्र किनार्यालगत असल्यामुळे अलिबागला मोठ्या प्रमाणात वादळाला तोंड द्यावे लागते. वार्यामुळे विद्युत वाहिन्यांवर झाडाच्या फांद्या पडून अनेकदा वीज जाते. छोट्या-छोट्या अनेक कारणांमुळे पुरवठा खंडित होऊ नये,यासाठी हा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येत आहे.