नेत्यांनो, तळा तालुक्यातदेखील माणसंच राहतात

By Raigad Times    17-Oct-2020
Total Views |
talaa_1  H x W:
 
विराज टिळक/ तळा । जिल्ह्यातील तळा तालुका हा अतिशय ग्रामीण तालुका म्हणून आपल्या परिचयाचा बनला आहे. जगाची जरी 21 व्या शतकाकडे वाटचाल चालली असली तरी तळा तालुका अद्यापही शेकडो वर्ष मागे चालला आहे. तालुक्यातील बहुतेक जण तालुका सोडून गेलेत आणि राहिलेले देखील आपलं राहत असलेलं घर दार सोडून जाण्याच्या तयारीत आहेत.. 
 
सरकारी कर्मचारी तर तळ्यात राहणं म्हणजे जेल मध्ये राहण्यासारखं समजतात. त्यातले काही अपवाद म्हणून नाईलाजास्तव तळ्यात राहत आहेत.. आता याची कारण काय बर असतील ? सर्वात मोठं कारण म्हणजे नेते मंडळींचं ताळ्यावर असेल विशेष प्रेम. त्यांचं काम एकच निवडणुका आल्या कि बसेस, ट्रक किंवा मिळेल ते वाहन बुक करायचं आणि तालुका सोडून गेलेल्या मतदारांना एक दिवस मतदानासाठी आपल्या गावी आणायचं !
 
पण आपण हा विचार केला का तुम्हला आम्हाला हे गाव सोडण्याची वेळ कोणी आणली ? का आपल्याला आपलं राहत घर दार सोडावं लागलं जरा नीट विचार करा कारण आपल्याला तालुक्यात मुबलक सोइ मिळत नाहीत, रोजगार मिळत नाही, रोजगार करायचा झाला तर वीज मिळत नाही, वीज नाही तर पिण्यासाठी पाणी मिळत नाही, विचार केलात तर एकही गोष्ट धड नाही, म्हणून कित्येकांनी मुंबई गाठली.
 
इथल्या मोठ्या नेते मंडळींचं महावितरण कंपनीवर विशेष प्रेम असल्याने तळा तालुका मागे नेण्यात हे यशस्वी होत आहेत.. तळा तालुका होऊन इतके वर्ष झाली पण संपूर्ण तालुका एकाच इंकमरवर अवलंबून आहे? आणखी इंकमर आणण्यासाठी कोणी प्रयत्न करायचा? कर्मचारी वर्ग कमी आहे तो पुरेसा करण्यासाठी कोणी प्रयत्न करायचा? नागरिकांना वीज प्रवाह सुरळीत नसून देखील भरमसाठ बील आलीत तो प्रश्न कोणी मार्गी लावायचा?
 
कित्येक लोकांची उपकरणे कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे ना दुरुस्त झालीत त्याचा जाब महावितरण कंपनीला कोणी विचारायचा? आणि हे का विचारत नाहीत? तीन जून पासून आज पाच महिने झाले तरी देखील अद्यापही महावितरण विद्युत पुरवठा सुरळीत करू शकले नाही. पालकमंत्री साहेबानी कित्येक वेळा तळा तालुक्याला भेटी दिल्या पण नागरिकांच्या मूलभूत गरजा काय आहेत हे अद्यापही समजून घेतलेलं नाही.
 
मुख्य गरज आहे पाणी पण वीज नसेल तर पाणी कुठून मिळणार. आणि मुख्य पाणीच नसेल तर लोक कशी राहणार ? रोजगार देणं तर खूप लांबचा विषय आहे.. आता तरी पालकमंत्री साहेबांनी जनतेचा विश्वास जिंकण्याची गरज आहे. अभी नहीं तो कभी नहीं असं म्हणण्याची वेळ आता सामान्य जनतेवर येऊन ठेपली आहे....