कोरोना अपडेट : रायगडात आज 341 रुग्णांची कोरोनावर मात

By Raigad Times    17-Oct-2020
Total Views |
Raigad Corona Update 17 O
दिवसभरात 227 नवे रुग्ण, 5 रुग्णांचा मृत्यू
अलिबाग : रायगड जिल्ह्यात आज 227 नव्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली असून, 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 341 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 92 टक्के रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
 
आजअखेर जिल्ह्यातील 1 लाख 86 हजार 922 नागरिकांनी कोरोना चाचणी केली आहे. यापैकी 51 हजार 873 जण कोरोना पॉझिटीव्ह आले होते. यापैकी 47 हजार 979 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर 1 हजार 467 रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण एकूण कोरोना बाधित रुग्णांच्या 92 टक्के तर मृत्यूचे प्रमाण 3 टक्के आहे.
 
सद्यस्थितीत केवळ 5 टक्के म्हणजेच 2 हजार 427 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यातही 1 हजार 549 रुग्ण होम हायसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. तर उर्वरित रुग्णांवर कोव्हिड हॉस्पिटल, कोव्हिड हॉस्पिटल व कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.
 
आज (17 ऑक्टोबर) कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या व मृत्यू झालेल्या रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :-
 
Raigad Corona Update 17 O